Breaking News

नोटा रद्द चा प्रस्ताव माझ्यापुढे मांडला नव्हता - रघुराम राजन

नवी दिल्ली, दि. 03, सप्टेंबर - नोटा रद्द करण्याच्या निर्णयाने जे फायदे होतील त्या पेक्षा या निर्णयाचे तोटे अधिक असल्याने नोटा रद्द च्या कल्पनेला आपला  विरोध राहिला आहे , असा खुलासा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ . रघुराम राजन यांनी केला आहे . ’ आय डू व्हॉट आय डू ’ या पुस्तकात राजन यांनी नोटा रद्द  बाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना राजन यांनी केलेल्या भाषणांचे संकलन या पुस्तकात आहे. त्यातून राजन आणि मोदी  सरकारमधील संबंध मधुर नव्हते हे उघड होते . 
’आपण रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी असताना नोटा रद्द करण्याचा प्रस्ताव सरकारकडून मांडला गेला नव्हता, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे . नोटा रद्द च्या  निर्णयाबाबत डॉ . राजन यांनी प्रथमच आपली भूमिका मांडली आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये नोटा रद्द बाबत तुमची भूमिका काय आहे असे मला विचारले गेले होते .  त्यावेळी मी माझी भूमिका तोंडी स्पष्ट केली होती . नोटा रद्द च्या निर्णयाचे दीर्घकालीन फायदे असू शकतील . मात्र या निर्णयाने अर्थव्यवस्थेवर छोट्या कालावधीत  होणारे अनिष्ट परिणाम लक्षात घेता हा निर्णय योग्य ठरणार नाही , असे माझे मत होते . माझे हे मत मी अत्यंत स्पष्टपणे सरकारला कळवले होते , असे राजन यांनी  पुस्तकात म्हटले आहे.