Breaking News

महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या हजारो जवानांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

मुंबई, दि. 22, सप्टेंबर - महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या हजारो जवानांनी शासनाकडून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांची आज कृष्णकुंज येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना निवेदन दिले.
महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान शासकीय सेवेत सामावून घ्यावे व पगारवाढ करावी या मागणीसाठी संपावर गेले होते. घाटकोपर येथील मेट्रो स्थानकावर शेकडो  जवानांनी आंदोलन केले होते. यामुळे मेट्रो, विमानतळ, टोल नाका, टाटा हॉस्पिटल, मोनोरेल, मुंबई महापालिकेची रुग्णालये येथील सुरक्षेला फटका बसला आहे.