Breaking News

रोखपालाकडून कंपनीच्या 84 लाख रुपयांचा अपहार

पुणे, दि. 22, सप्टेंबर -  बिबवेवाडी येथील अ‍ॅटोमॅटीक आयटी सर्व्हिस प्रा.लि. या कंपनीत काम करणा-या रोखपालानेच कंपनीच्या 84 लाख रुपयांचा अपहार  केला असून ही रक्कम चेकद्वारे स्वतःच्या बँक खात्यात जमा केली.याप्रकरणी अमित कुलकर्णी (वय-41, रा. ऋतुरंग सोसायटी, सहकारनगर, पुणे) यांनी फिर्याद  दिली असून रोखपाल हर्षल अरुण खेडले (वय-31, रा.गजराज सोसायटी, नवी पेठ, पुणे) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, आरोपीने आणि त्याच्या अन्य काही साथीदाराने 2015 ते 2017 या कालावधीत कंपनीची आर्थिक फसवणूक करत कंपनीच्या खासगी बँकेच्या चेकद्वारे  तब्बल 84 लाख 60 हजाराची रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर जमा केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.