नवरात्रीच्या काळात लोडशेडींग बंद करा!
शिवसेना मलकापूर शाखेचे विद्युत महामंडळाच्या अभियंत्यांना निवेदन
बुलडाणा, दि. 21, सप्टेंबर - अघोषित लोडशेडींग व फॉल्टी मिटरमुळे येत असलेल्या जास्तीच्या विद्युत बिलांमुळे नागरिक त्रस्त असून आगामी नवरात्र काळात लोडशेडींग पूर्णपणे बंद करावी तसेच मोठ्या प्रमाणात असलेली फॉल्टी मिटर तात्काळ बदलून देवून नागरिकांना दिलासा द्यावा आशा आग्रही मागणीचे निवेदन 19 सप्टेंबर रोजी शिवसेना शहरप्रमुख किशोर नवले, माजी तालुकाप्रमुख अरुण अग्रवाल यांचे नेतृत्वात महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या अभियंत्यांना देण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले की, गेल्या काही दिवसांपासून मलकापूर तालुक्यात अघोषित भारनियमन सुरु आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. 21 सप्टेंबर पासून पवित्र नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार असून या उत्सवादरम्यान लोडशेडींग पूर्णत: बंद करावी तसेच तालुक्यातील अनेक नागरिकांची विद्युत मीटर ही फॉल्टी असल्याने त्यांना नाहक जास्तीच्या बिलांचा भूदर्ंड भरावा लागत असून तक्रार केल्यानंतरही नागरिकांची कुठलीही दखल घेतल्या जात नसून त्यांच्याकडून जास्तीची बिले वसूल करण्यात येत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर असलेले फॉल्टी मिटर तात्काळ बदलून विद्युत ग्राहकांना तात्काळ दिलासा द्यावा, अशी मागणीही शिवसेना पदाधिकार्यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना शहरप्रमुख किशोर नवले, माजी तालुकाप्रमुख अरुण अग्रवाल, मलकापूर ग्रामीणचे उपसरपंच तथा कृउबासचे सदस्य उमेश राऊत, उपतालुका प्रमुख राजेशसिंह राजपूत, किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार, शहर उपप्रमुख उमेश हिरुळकर, विश्वंभर माळी आदी मान्यवर उपस्थित होते.