देऊळगाव राजा तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे पडघम!
बुलडाणा, दि. 21, सप्टेंबर - तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामपंचायतींचा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने गावपातळीवर राजकीय जुळवा जुळवीला वेग आला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून गावपातळीवर आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी राजकीय पक्ष ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे प्राधान्याने लक्ष देताना दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकांना अलीकडच्या काळात वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतींमधील सत्ता काबीज करण्याकडेही राजकीय पक्षांचा कल अधिक असतो. काही ग्रामपंचायती मोठया असल्याने त्या मिळवण्यासाठी राजकीय पक्षांची मेहनत सुरू आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती आज आर्थिकदृष्टया सक्षम आहेत.
औद्योगिकीकरण,इमारतींच्या संख्येत लक्षणीय होणारी वाढ यामुळे अनेक ग्रामपंचायती मजबूत होऊ लागल्या आहेत. अशा ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ अधिक असते. त्यामुळे दिवसेंदिवस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला वेगळे स्वरूप प्राप्तहोऊ लागले आहे. प्रत्येक गावागावांतील नेतेमंडळी, कार्यकर्त्यांनी आपले वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याने मोर्चेबांधणीस मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे व यामध्ये पूर्वी पेक्षा अधिक जास्त तरुण मंडळींचा सिहांचा वाटा दिसत आहे. मोठ्या प्रमाणात तरुण यंदाच्या निवडणुकीत उतरला आहे. यासाठी तालुक्यात गावा गावात ग्रामपंचायतींसाठी जोरदार राजकीय संघर्ष पहावयास मिळत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा बसतो ना बसतो तोच तालुक्यात पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकींच्या रणधुमाळीस प्रारंभ झाला आहे. तालुक्यात 19 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. आता आचारसंहिता लागू झालेली आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवड होणार आहे. यामुळे इच्छुकांनी आत्तापासूनच तयारी सुरू केलेली असून गावागावांतील स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी उमेदवारांची जुळवाजुळव करण्यास सुरवात केलेली आहे. आता नेमकं जनता जनार्धन कोणाच्या पारड्यात आपले मतदान रुपी आशीर्वाद टाकेल हे लवकरच स्पष्ठ होईल परंतु मत मोजणी होई पर्यत दिग्गजांचे काळजाच्या ठोक्याची गती मंदावनार नाही.