लखनौ मेट्रोत पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड
लखनौ, दि. 06, सप्टेंबर - आजपासून सुरु झालेली लखनौ मेट्रो पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाडामुळे बंद झाली. दुर्गापुरी आणि मैवया स्थानकांदरम्यान मेट्रो दीड तास थांबली होती. यामुळे संकटकालीन दरवाजा उघडून प्रवाशांना अर्ध्या रस्त्यातच उतरवण्यात आले. या घटनेनंतर प्रवाशांनी रुळावर उतरुन दुर्गापुर स्थानक गाठले. त्यानंतर प्रवाशांना दुस-या रेल्वेने पाठवण्यात आले. तांत्रिक बिघाड झालेली रेल्वे दुरूस्तीकरिता नेण्यात आली. सध्या मेट्रोचा एक मार्ग सुरु ठेवण्यात आला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ मेट्रोचे उद्घाटन केले.
