वाकड येथे मुळा नदीत 2 मुले बुडाली; शोधकार्य सुरू
पुणे, दि. 06, सप्टेंबर - गणेश विसर्जन करताना पिंपरी चिंचवड शहरातील वाकड कस्पाटे वस्ती येथील मुळा नदीत दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन मुले बुडाली. पिंपरी चिंचवड फायर ब्रिगेडच्या जवानांकडून दुपारपासून या दोन मुलांचा शोध सुरू आहे. तसेच वाकड सांगवी पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मुळा नदीत बुडालेली ही मुले गवत आणि गाळात रुतल्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने फायर ब्रिगेडची शोध मोहीम सुरू आहे. वाकड आणि बालेवाडी गावाच्यामधून ही नदी गेली आहे. बालेवाडीत एका विटभट्टीवरील मजुरांची ही मुले असल्याची प्राथमिक माहिती वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी दिली आहे. बालेवाडी नदी किनार्याजवळून ही मुले पाण्यात उतरली होती.