Breaking News

एमआयएमने वंदे मातरम गीताचा सन्मान करावयास हवा- अबु आझमी

नांदेड, दि. 22, सप्टेंबर - औरंगाबाद महापालिकेत सभेच्या वेळी एमआयएमने वंदे मातरम गीताचा सन्मान करावयास हवा होता असे मत समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र  प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांनी व्यक्त केले.नांदेड महापालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमिवर ते शहरात आले असताना त्यांनी वरिल प्रतिक्रीया व्यक्त केली. समाजवादी पक्ष  नांदेड मनपा निवडणूकीत 50 उमेदवार उभे करणार आहे. तसेच आपली व एमआयएमची युती होणार नसल्याचे त्यांनी जाहिर केलेतर काँग्रेसने केवळ मुस्लीमांना  वापरून घेतले, नीती सेक्यूलर असलेल्या काँग्रेसची निती खराब असल्याची टीका त्यांनी केली.