Breaking News

भोजपुरी अभिनेता मनोज पांडेला बलात्कारप्रकरणी अटक

ठाणे, दि. 22, सप्टेंबर - भोजपुरी अभिनेता मनोज पांडे याला बलात्काराच्या आरोपावरून पोलिसांनी कल्याणमधून अटक केली. 15 सप्टेंबर रोजी पीडित महिलेने  चारकोप पोलीस ठाण्यात मनोजविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांकडून ही कारवाई करून त्याला अटक केली. चित्रपटात काम मिळवून देण्याचे  आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. मनोज पांडे याने भोजपुरी चित्रपटासह हिंदी चित्रपटातही भूमिका साकारल्या आहेत.