सर्व प्रमुख धरणे भरली ; विदर्भात मात्र पावसाची प्रतीक्षा
मुंबई, दि. 21, सप्टेंबर - कोयनेसह राज्यातील सर्व प्रमुख धरणे भरल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे . राज्यातील सर्वात मोठे समजले जाणारे जायकवाडी धरण 90 टक्के भरले असून ते उद्यापर्यंत पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे . विदर्भाकडे मात्र पावसाने पाठ फिरवली आहे . त्यामुळे विदर्भातील धरणांमध्ये अत्यल्प पाणी साठा आहे.
वीज निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेले कोयना धरण 99 टक्के भरले असून ते कोणत्याही क्षणी पूर्ण भरण्याची शक्यता आहे. कोयना धरणातून आज सकाळपासून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून त्यातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे . चांदोली धरणातूनही आज सकाळपासून 14 हजार क्युसेक्स एवढा विसर्ग सुरु करण्यात आला आहे . कोयना व चांदोली धरणांमधून एकदम विसर्ग सुरु झाल्याने सांगली शहर व जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . नगर जिल्ह्यातील भंडारदरा , मुळा निळवंडे या धरणातूनही विसर्ग सुरु करण्यात आला आहे . नाशिक जिल्ह्यातील गंगापूर , दारणा या धरणातूनही विसर्ग सुरु आहे . त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धारण उद्या पूर्णपणे भरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे . सध्या जायकवाडी धरण 90 टक्के भरले असल्याचे सांगितले जात आहे. नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असल्याने या जिल्ह्यातील धरणांतून होणारा विसर्ग उद्या वाढण्याची शक्यता आहे . पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने मुठा , भीमा , नीरा या नद्यांमध्ये मोठा विसर्ग सुरु आहे . त्यामुळे उजनी धरणातूनही पाणी सोडावे लागले आहे . सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.