Breaking News

शिष्यवृत्तीसाठी राज्यभर आंदोलन करणार - फैरोज खान

पुणे, दि. 21, सप्टेंबर - महाराष्ट्रातील मागसवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मागील दोन वर्षांपासून मिळालेली नाही. यामध्ये सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांचा समावेश  आहे. अनेक मागासवर्गीय मुलांचे शिक्षण शासकिय शिष्यवृतीवर अवलंबुन असते अशा परिस्थितीत दोन वर्षे शिष्यवृत्ती न देऊन सरकारने या विद्यार्थांवर अन्याय केला  आहे, या अन्यायाविरोधात एनएसयुआयच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती एनएसयुआयचे राष्ट्रीय अध्यक्ष फैरोज खान यांनी बुधवारी  पत्रकार परिषदेत दिली. 
यावेळी एनएसयुआयचे राष्ट्रीय सचिव शिवराज मोरे, प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, शहराध्यक्ष भूषण रानभरे उपस्थित होते. फैरोज खान खान म्हणाले, मागासवर्गीय  विद्यार्थ्यांना महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांमध्ये हक्काची शिष्यवृती मिळविण्यासाठी संधर्ष करावा लागत आहे. महाराष्ट्र सरकारनेही मागील दोन वर्षापासून शिष्यवृती  दिलेली नाहीयामुळे लाखो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अडचणींचा सामाना करावा लागतोय, एकट्या पुणे शहरात 20 हजाराहुन अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृती मिळालेली  नाही. यासंदर्भात राज्य सरकारकडे विचारणा केली असता काही विद्यार्थ्यांचे अर्ज गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार्‍या  सामाजिक न्याय विभागाच्या या हलगर्जीपणाची नैतीक जबाबदारी स्विकारून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खान यांनी  केली. दरम्यान, राज्यसरकारचा निषेध आणि बडोले यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी एनएसयुआयच्या वतीने बुधवारी दुपारी राणी लक्ष्मीबाई (बालगंधर्व) चौकात  निदर्शने करण्यात आली.