मुरुड-जंजिरानजीकच्या बंदरात तटरक्षक दलाच्या दोन सुरक्षा बोटी तैनात
अलिबाग, दि. 21, सप्टेंबर - सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा व अलिबाग जवळच्या बंदरात तटरक्षक दलाच्या सी-433 व सी-434 या दोन अद्ययावत बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. 26/11 च्या हल्ल्यानंतर सागरी किनारपट्टी संरक्षित करण्याचे मोठे आव्हान राज्याबरोबरच केंद्र सरकारसमोर आहे.
मुंबईसह कोकण किनारपट्टीजवळ नौदल व तटरक्षक दलाकडून संरक्षण कडे निर्माण केले जात आहे. याचाच हा एक भाग आहे. या दोन बोटी 27 मीटर लांब, 136 टन वजनाच्या असून यांचा वेग 45 नॉटिकल मैल इतका आहे. खोल समुद्रात 500 नॉटिकल मैलापर्यंत गस्त घालणार असून अत्याधुनिक नेव्हीगेशन यंत्रणेने या बोटी सज्ज आहेत. शत्रूपासून देशाच्या हद्दीचे रक्षण करण्यासाठी आणखी सुरक्षा बोटींची आवश्यकता असल्याचे तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी सांगितले.