Breaking News

महाआरोग्य शिबीरास रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद

बुलडाणा, दि. 13, सप्टेंबर - अनुराधा मिशनचे प्रेरणास्थान कर्मयोगी तात्यासाहेब बोंदे्र यांचा 75 वा वाढदिवस साजरा करतांना मागिल 25 वर्षात 117 विविध  आरोग्य शिबीरे यशस्वीरीत्या पुर्ण करणार्‍या अनुराधा मिशनने या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित भव्य अशा महाआरोग्य शिबीरास 10 सप्टेंबर रोजी अनुराधा नगर  परीसरात सुरूवात झाली. 
या महा आरोग्य शिबीरासाठी जिल्हाभरातून रुग्णांची उपस्थिती लाभली, या शिबीराचे अधिकृत उद्घाटन अखिल भारतीय कॉगे्रस कमिटीचे महासचिव मुकूलजी  वासनिक व राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे. त्यापुर्वीच 10 सप्टेंबर रोजी कर्करूग्ण आणि दिव्यांगासाठी जयपुर  फुट या कृत्रिम अवयव जोडणी शिबीराचा प्रारंभ होवून त्यात 4215 च्यावर रूग्णांची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. तर जयपुर फुट जोडणीसाठी  दिव्यांगाच्या अवयवाचे मोजमाप साधु वासवाणी मिशन पुणे यांच्या तज्ञ चमुने केले.
शिबीरात तपासणीसाठी आलेल्या कर्करूग्णांची तपासणी व निदान झाल्यानंतर त्यांना आवश्यक ती औषधी यावेळी मोफत वितरीत करण्यात आली. स्त्रियांमधील  छातीच्या कर्करोगासाठी आवश्यक असलेली मॅमोग्राफी तपासणी दत्ता मेघे मेडीकल कॉलेज वर्धा यांच्या तज्ञ चमुने यावेळी केली. शिबीरात मोफत सोनोग्राफी, एक्सरे व  रक्तांच्या चाचण्या करण्यात आले. निदान झालेल्या रूग्णांना संत गजानन महाराज संस्थान शेगांव व अनुराधा मिशन चिखली यांच्या वतीने मोफत औषधी वितरीत  करण्यात आली. जयपुर फुट जोडणी संदर्भात निवड झालेल्या दिव्यांगांना त्यांच्या मोजमापानुसार कृत्रिम अवयव तयार झाल्यावर पुर्व सुचना देवून वितरीत केल्या  जाणार आहे. आज सुरू झालेल्या या शिबीरात मोठया संख्येने तपासणीसाठी आलेल्या रूग्णांना सर्वप्रकारच्या मोफत चाचण्या व औषधोपचार देण्यात आले असून  इतर हद्यरोग, स्त्रिरोग, बालरोग, कान-नाक-घसा, अशा प्रकारचे आजारावर तपासणी शिबीर स्थळी करण्यात येणार आहे.
शिवे भावे जिव सेवा या ब्रिद वाक्यावर कायम राहुन अनुराधा मिशन कायमच रूग्णसेवेत अगे्रसर राहीली आहे. दिव्यांगासाठी केवळ जयपुर फुट जोडणी एवढयावर न  थांबता जिल्हयातील दिव्यांगाना शासकीय समाज कल्याण विभागा मार्फत तपासणीची पुर्तता करून त्यांना अपंग प्रमाणपत्राचे वाटप, त्याचबरोबर, संजयगांधी शासकीय  योजनेचा लाभ, परीवहन महामंडळातर्फे दिव्यांगाना दिल्या जाणार्‍या प्रवास सवलतीचा लाभ, मिशन मिळवून देत आले आहे. तसेच कॅन्सरग्रस्त रूग्णांना मोफत  औषधोपचारा बरोबरच शस्त्रक्रीयेसाठी आर्थिक  मदत देण्यात सदैव तत्पर राहीलेली आहे. त्यामुळे अनुराधा मिशनव्दारे आयोजित शिबीरास सदेैव नागरीकांची गर्दी  असते. सेवाभाव मुख्य मानून आयोजित केल्या जाणार्‍या शिबीराचे परीणामी जिल्हयात नामाकींंत सेवा भावी असलेली संस्था संत गजानन महाराज संस्थान शेगांव  यांनीही त्यांची स्वतंत्र मोबाईल व्हॅन शिबीर स्थळी पाठवून रूग्णांना मोफत औषधी वितरण केले. त्याचबरेाबर रायगड येथील संग्राम तोगरे व सुमनताई तोगरे या  उभयतांनी अनुराधा मिशनच्या कार्याने प्रभावीत होवून कर्करूग्णांना वितरीत करण्यासाठी 3 लक्ष रूपयाची औषधी शिबीर स्थळी स्वखर्चाने पोहचविली.
सदर शिबीरामध्ये गेटवेल कॅन्सर क्लिनिकचे कर्करोग तज्ञ डॉ. प्रसाद सोर, डॉ. श्रध्दा सोर, डॉ. धनेश्‍वर, क्युरी मानवता मिशन नाशिकचे कर्करोग तज्ञ डॉ. सागर  भालेराव, डॉ. आश्‍विन वाघ, डॉ. ॠतुजा महाजन, डॉ. निकिता चित्ते, गौरी कोकणे, कमलनयन बजाज हॉस्पीटल औरंगाबादचे कर्करोग तज्ञ डॉ. राजेश सावजी, डॉ.  मुकेश राठोड, सेट नंदलाल धुत हॉस्पीटल औरंगाबादचे कर्करोग तज्ञ डॉ. रविंद्र महाजन, डॉ. काळे, दिपक हॉस्पीटल जालनाचे कर्करोग तज्ञ डॉ. परीक्षित ठाकुर,  कृपामयी हॉस्पीटल औरंगाबादचे कर्करोग डॉ. विराज बोरगांवकर, डॉ. उल्हास पाटील गोदावरी  मेडीकल हॉस्पीटल जळगांवचे कर्करोग तज्ञ डॉ.संजीव जयस्वाल, दत्ता  मेघे मेडीकल सायन्स कॉलेज वर्धाचे डॉक्टर चमु, साधु वासवाणी मिशन पुणेचे डॉ. मिलींद जाधव,   डॉ. अमोल सोनटक्के, डॉ. राहुल सरोज, डॉ. शैलेश छाजेड,  डॉ. सागर गुप्ता, डॉ. नितेश छाजेड, यांनी रूग्णांना सेवा प्रदान केली.