Breaking News

कोतूळ येथे मुळा नदीवर नविन पुलाची मागणी

अकोले, दि. 25, सप्टेंबर - तालुक्यातील मुळा परिसरातील कोतूळ येथील मुळा नदीच्या पात्रात पिंपळगाव खांड लघुसिंचन तलावाच्या पाण्याचा फुगवटा आल्याने  या नदी पात्र पाण्याने भरुन विस्तीर्ण स्वरुप धारण केले आहे. या मुळा नदीवर पुल पाण्याखाली गेल्याने या नदीपात्रातून जीव धोक्यात घालून होडयांचा प्रवास केला  जात आहे. या नदीवर पुलाची मागणी मोठया प्रमाणावर केली जात आहे.
या नदीवरील होडयांमध्ाून होणारा प्रवास हा धोकेदायक असून यात क्षमतेपेक्षा जास्त माणसे त्याचप्रमाणे मोटारसायकल डझनाहून अधिक टाकल्या जातात. त्यामुळे  होडयांचे संतुलन बिघडून अपघात होण्याची दाट शक्यता असते. अत्यंत धोकादायक अशा परिस्थितीत कोतूळ नदीवरील या होडया सर्रास चालविल्या जात आहे. त्या  तत्परतेने आदेश काढून शासनाने बंद कराव्यात. याकामी लवकरात लवकर मोठा पुल होण्याची मागणी परिसरातील प्रवासी वर्गासह जनतेकडून होत आहे. भाजप  सरकारने या मागणीस उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. परंतु पुलाचे काम धरणाची सातफुट उंची वाढविण्या अगोदर होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच झाल्यास  सदरचा पुल पुर्णत्वास नेणेत अडचणी निर्माण घेतील म्हणून सदरच्या पुल किमान एक वर्षाच्या आत व्हावा अशी जलसंपदा विभागाने सुचना दिल्या आहेत. सध्या  कोतूळहून अकोल्याला जाण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना खुप लांबच्या पल्याने म्हणजे धामणगाव, मोग्रस, पांगरी अशा दुरच्या मार्गाने जावे लागते. त्यामुळे जास्त  पैसे तर मोजावे लागतात. परंतु वेळेचा सुध्दा अपव्यय होत असतो. हिच बाब नोकरी करणार्‍या लोकांबाबत देखील सातत्याने घडत असते. त्याचप्रमाणे सदरचे रस्ते  देखील खराब असल्याने प्रवशांची फार मोठया प्रमाणात कुचंबना होत आहे.