Breaking News

शेवगावमधील बांधकाम विभागात चोरट्यांनी मारला डल्ला

अहमदनगर, दि. 21, सप्टेंबर - येथील  पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागामधील संगणक व इतर साहित्य चोरट्यांनी लांबवले.
शेवगावमधील पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्टोअर रूम चे कुलूप तोडून चोरट्यांनी संगणक व इतर साहित्य असा 27 हजार 54 रुपयांचा माल चोरून  नेला.याविषयी उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गर्जे  करत आहेत.
संगमनेर ः म्हाळुंगी  नदीपात्रात पूर्ववैमनस्यांतून आशा रवींद्र चव्हाण (वय 24) यांना चार  जणांनी बेदम मारहाण करण्यात आली.
 आशा चव्हाण या म्हाळुंगी नदीपात्रात (संगमनेर) भावाच्या मुलास आणण्यासाठी गेल्या असता पूर्वीचा राग मनात धरून सुनीता चिमाजी शिंदे,चिमाजी हुश्या  शिंदे,पप्पू चिमाजी शिंदे,मास्तर नाना चव्हाण (सर्व राहणार भराड वस्ती) यांनी आशा चव्हाण हिस शिवीगाळ करून विळ्याच्या साहाय्याने मनगटावर वर करून  जखमी केले.या संदर्भात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरे करत आहेत.
श्रीगोंदा ः हिंगणी दुमाला येथे बांधकामास अडथळा आणल्याच्या रागावरून दोन जणांनी सुमन कुरंदले यांना मारहाण केली.
घरबांधकामास अडथळा आणता  काय असे विचारून यशोदा रामदास जाधव व तनिषा दत्तात्रय जाधव (दोघे राहणार बेलवंडी फाटा ) यांनी सुमन शंकर कुरंदले  (वय 58 वर्षे ) यांना लाथाबुक्क्याने मारहाण करून  त्यांची स्कुटी गाडी ढकलून देऊन तिचेही नुकसान केले.या विषयी सुमन कुरंदले यांनी फिर्याद दिली असून   पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल देशमुख करत आहे.
राहता ः साकुरी परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे दरावाजाचे कुलूप  तोडून 71 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल लंपास केला.
साकुरी परिसरात राहणारे अशोक  गुरावे यांच्या बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरातील एल.सी.डी.टीव्ही , गॅस सिलेंडर  ,शेगडी,घड्याळ चांदीच्या भेटवस्तू  असा एकंदरीत 71 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी पळवून नेला.या बद्दल अशोक गुरावे यांनी फिर्याद दिली असून पुढील ए.पी .आय.तपास पवार करत  आहेत.