ढोल-ताशांचा गजरात चिंचवडमध्ये गणेश विसर्जनाची मिरवणूक
पुणे, दि. 06, सप्टेंबर - ढोल-ताशांचा गजर... गणपती बाप्पा मोरया... ’गणपती बाप्पा मोरया.... पुढच्या वर्षी लवकर या.... असा अखंड जयघोषांचा गणेशभक्तांचा स्वर आज शिगेला पोहोचला. गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात भंडार्यांची, फुलांची मनसोक्त उधळण करत मोठ्या उत्साहात झाली. गणेश विसर्जनाची मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनी चांगलीच रंगत आणली आहे.
गणेशभक्तांचे स्वागत करण्यासाठी चिंचवड, चापेकर चौकात महापालिका, पोलिसांच्यावतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला. महापौर नितीन काळजे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, अतिरीक्त आयुक्त अच्युत हंगे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अनुराधा गोरखे, मोना कुलकर्णी, सहआयुक्त दिलीप गावडे यांच्याहस्ते गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत आहे.
वेताळनगर येथील शिवतेज स्पोर्ट्स क्लब मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक विसर्जन घाटाकडे रवाना झाली. तर सायंकाळी 7 वाजेपर्यंत 13 गणेश मंडळाच्या मिरवणुका घाटाकडे रवाना झाल्या होत्या.