लिंगायतांचा अल्पसंख्यांकात समावेश करण्याच्या मागणीसाठी मोर्चा
लातूर, दि. 04, सप्टेंबर - अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती तर्फे लिंगायत धर्माला संवैधानिक देण्यात यावा व स्वतंत्र धर्म म्हणून त्याचा समावेश अल्पसंख्याकांत करण्यात यावा या व इतर अनेक मागण्यासाठी आज लातूर येथे लिंगायत समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला होता मोर्चाची सुरूवात डाँ माता महादेवी आीण संत शिवलिंग शिवगचार्य महाराज यांच्या हस्ते भगवा धवज फडकावून मोर्चाची सुरूवात झाली.
या मोर्चात लिंगायत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रिडा संकूल येथून निघून मेन रोड मार्गे नवीन कलेक्टर ऑफीस येथे मोर्चाची सांगता झाली. सदरील मोर्चास शहरातील सर्वधर्मीय विविध समाजिक संघटनांनी पाठिंबा दिला असून मुस्लिम समाजातर्फेही सदरील मोर्चास पाठिंबा देण्यात आला होता .
तसेच ईदगाह चौक येथे पीस फोरम लातूर, जमियते उलेमा ए हिंद लातूर, जमआत इस्लामी हिंद लातूर,आझाद युवा संघटन लातूर,अपना वतन संघटना,स्टूडंटस इस्लामिक आर्गेनाईजेशन ऑफ इंडिया, मुस्लिम आरक्षण मोर्चा लातूर, ऑल इंडीया एकता फोरम लातूर,रहेनूमा फॉऊंडेशन लातूर या संघटनांतर्फे मोर्चेकरांना पाणी पाऊचचे वाटप करण्यात आले.