महावितरण तांत्रिक कामगारांचे 6, 8 सप्टेंबरला आंदोलन
रत्नागिरी, दि. 04, सप्टेंबर - महावितरण कंपनीतील तांत्रिक कामगारांच्या विविध मागण्यांसाठी येत्या बुधवारी (6 सप्टें) राज्यभर निर्दशने तर गुरूवारी (8 सप्टेंबर) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणच्या तांत्रिक कामगार युनियनचे कोषाध्यक्ष संतोष घाडगे यांनी दिली. ते म्हणाले की, वीज मंडळाचे विभाजन झाल्यानंतर इन्फ्रा 1 आणि इन्फ्रा 2 या यंत्रणा आल्या. उपकेंद्राची जुनी यंत्रणा बदलणे, त्याची क्षमता वाढविण्याचे काम झाले. मात्र जुन्या वाहिन्या बदलल्या गेल्या नाहीत. जुन्या वाहिन्यांवर उपकेंद्रांची संख्या वाढली. त्यामुळे वाहिन्या खूप कमकुवत झाल्या. जुने निर्मितीचे संच बंद करून नवीन मोठ्या क्षमतेचे संच उभे केले. पारेषणलादेखील उपकेंद्राची क्षमता वाढवली. नवीन ब्रेकर बसविले. मात्र लघु व उच्चदाब वाहिन्या अद्याप जुन्याच आहेत. एखाद्या ठिकाणची वीजवाहिनी तुटल्यानंतर तेवढीच लाइन बदलली जाते. जुना खांब तुटल्यानंतर तोच खांब बदलला जातो. जुन्या वाहिन्यांमुळे कर्मचारी, ग्राहक, मुके प्राणी यांचा जीव जात आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या एखाद्या कर्मचार्यांचा किंवा ग्राहकाचा अपघात झाला तर संबंधित कर्मचार्याला शिक्षा दिला जाते. जमाव शांत करण्याचे कामही कर्मचार्यांवर सोपविले जाते. कंपनीच्या चुकीमुळे अपघात झाला तरी लोकप्रतिनिधी कर्मचार्यांवर कारवाईची मागणी करतात. कर्मचार्यांवर कारवाई झाली की लोकप्रतिनिधीही समाधान मानतात. मात्र मूळ समस्येचा कुणीही विचार करत नाही. निकृष्ट दर्जाची कामे, वीजचोरी आणि कंपनीत भरती होणार्या कर्मचार्यांच्या सुरक्षेचा विचार होत नसल्यामुळे कंपनीमध्ये भरती होणारा कर्मचारी असुरक्षित आहे. पावसाळ्यात अपघातांचे प्रमाण जास्त आहे. वाहिन्या बदलण्याचे काम दिल्यानंतर कंत्राटदार जुने काम किचकट असते म्हणून त्याला हात लावत नाहीत.
या विषयांकडे शासन व कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी तांत्रिक युनियनचे अध्यक्ष आर. जे. देवरे, उपाध्यक्ष रवी बारई, बी. आर. पवार, सरचिटणीस आर. टी. देवकांत, उपसरचिटणीस गजानन तुपे, प्रवीण पाटील, दिलीप कोरडे, सचिव उदय मुदरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन केले जाणार आहे, असे श्री. घाडगे यांनी सांगितले. तांत्रिक कामगार युनियनच्या मागण्या अशा आहेत - जुन्या वाहिन्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, जुन्या लघु व उच्चदाबाच्या वाहिन्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र इन्फ्रा करावा, जुन्या खांबांवर चढण्यासाठी शिडीची व्यवस्था करावी, शिडीगाडी बंद करू नये, सुरक्षा साधणे व सुरक्षा उपायोजना करावी, संभाव्य अपघाताबाबत जबाबदारी निश्चित करावी.