Breaking News

या हंगामात उसाला 2550 रु. एवढी एफआरपी

मुंबई, दि. 21, सप्टेंबर - 2017- 18 च्या हंगामासाठी उसासाठी प्रति टन 2550 रु. एवढी आधारभूत किंमत (‘एफआरपी) राहील असे राज्य सरकारतर्फे आज  जाहीर करण्यात आले . ज्या उसाचा उतारा 9. टक्के एवढा आहे अशा उसाला 2550 रु. तर त्यापुढील प्रत्येक एक टक्का उतार्‍यासाठी 268 रु. प्रति टन द्यावा  लागणार आहे. ज्या साखर कारखान्यांना या पेक्षा अधिक दर द्यावयाचा आहे अशा कारखान्यांना तशी मान्यता देण्याचे अधिकार साखर आयुक्तांना देण्यात आले  आहेत. केंद्र शासनाच्या कृषी मूल्य आयोगाने 2017-18 मधील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामासाठी ऊस खरेदीच्या आधारभूत किमतीत (एफआरपी) वाढीची  शिफारस केली होती . केंद्रीय मंत्रिमंडळाने मे मध्ये या शिफारशीला मान्यता दिली . 2016- 17, 2015-16 या दोन्ही वर्षात उसासाठीच्या एफ आर पी मध्ये  कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती . या वर्षी एफआरपी मध्ये 268 रु . एवढी वाढ करण्यात आली आहे. 2017-18 च्या गाळप हंगामाचे नियोजन करण्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीया अध्यक्षतेखाली मंत्री समितीची आज येथे बैठक झाली . त्यात हा निर्णय घेण्यात आला . सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी मंत्री पांडुरंग  फुंडकर, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर , साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह  मोहिते पाटील, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, आ. जयंत पाटील आदी उपस्थित होते.