Breaking News

बंद काळातील वेतन द्या, हजार सह्यांचे निवेदन

सोलापूर, दि. 01, सप्टेंबर - भविष्यनिर्वाह निधी कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी यंत्रमागधारकांनी सहा दिवसांचा बंद पुकारला होता. या कालावधीतील वेतन  देण्याची मागणी लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनने केली आहे. सहायक कामगार आयुक्त बी. आर. देशमुख यांना पाच हजार कामगारांच्या सह्यांचे निवेदन देण्यात  आले. कारखानदारांनी ऑगस्टला एक दिवसाचा लाक्षणिक बंद केला. त्यानंतर 17 ते 21 ऑगस्ट असे पाच दिवस उत्पादन बंद ठेवले. कामगार संघटनांना विश्‍वासात  घेता, एकतर्फी हा निर्णय झाला. तो कामगारविरोधी आहे. त्यांच्या न्याय्य, हक्कावर गदा आणणारी आहे. या काळावधीतील वेतन देण्याचा विचार करू, असे म्हणणारे  कारखानदार पुन्हा ’बंद’च्या पावित्र्यात आहे. त्यापासून त्यांना रोखावे, असे निवेदनात म्हटले आहे. युनियनचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखालील  शिष्टमंडळाने श्री. देशमुख यांची भेट घेतली. माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, किशोर मेहता, लक्ष्मण माळी, युसूफ शेख, बाबू कोकणे, बापू साबळे, दाऊद शेख,  विश्‍वनाथ स्वामी, धनंजय हुंडेकरी, अनिल वासम आदी उपस्थित होते.