Breaking News

महिला, लहान मुलीवर हल्ला करणा-या भोंदू बाबाला दुहेरी जन्मठेप

पुणे, दि. 01, सप्टेंबर - सराफाकडे गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने परत मागणा-या महिलेचा आणि तिच्या दीड वर्षीय मुलीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून  हत्या करणा-या भोंदू बाबाला न्यायालयाने दुहेरी जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या  न्यायालयाने हा आदेश दिला. दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्षाची अतिरीक्त साधी कैद भोगावी लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. गड्डामेदी कनक  राजू शंकर गौडा ऊर्फ रामदास महाराज ऊर्फ दत्तगुरू महाराज (वय 60, रा. माण, ता. मुळशी. मूळ रा. आंध्रप्रदेश) असे शिक्षा झालेल्या भोंदूबाबाचे नाव आहे.  आरोपीने सुभद्रा काशिनाथ ऊर्फ कासाराम चव्हाण (वय - 35) आणि बसंती काशिनाथ ऊर्फ कासाराम चव्हाण (वय-दीड वर्षे) या मायलेकींची हत्या केली.  याप्रकरणी सुभद्रा चव्हाण यांचे वडील जगन्नाथ काळे (रा. गुलबर्गा, कर्नाटक) यांनी हिंडवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एप्रिल 2013 मध्ये ही घडली  हिंजवडी जवळील माण येथे घडली होती. फिर्यादी काळे हे पत्नी व मुला-मुलींसह माण परिसरातील राक्षेवस्ती येथील एका विटभट्टीवर काम करत होते. तर, आरोपी  याच परिसरातील एका इमारतीच्या तळमजल्यावरील खोलीत भाड्याने राहत होता. तो धार्मिक विधी करून उपजिवीका भागवत होता. आरोपी आणि फिर्यादी एकाच  गावचे असल्याने त्यांची ओळख झाली होती.