Breaking News

मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने लालूप्रसादांचे नितीश कुमारांवर टीकास्त्र

नवी दिल्ली, दि. 04, सप्टेंबर - कळपापासून वेगळ्या झालेल्या माकडाला कोणीच विचारत नाही, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर केली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात संयुक्त जनता दल व अण्णाद्रमुक पक्षाला स्थान देण्यात आलेले नाही. त्यापार्श्‍वभूमीवर लालू यांनी ट्विटचा सपाटा लावत नितीश यांच्यावर  टीकास्त्र सोडले. एकावेळी दोन बोटींचा आधार घेणार अडचणीतच येतात. नितीश कुमार यांना तर शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रणही देण्यात आलेले नाही.  नितीशकुमार यांच्यावर भाजपला विश्‍वास उरलेला नाही.जी व्यक्ती आपल्या माणसांशी एकनिष्ठ राहू शकली नाही, तिच्यावर कोणी विश्‍वास ठेऊ शकत नाही, अशी  टीका लालू यांनी केली आहे.