Breaking News

उत्तर प्रदेशात भरदिवसा भाजपच्या दोन नेत्यांवर गोळीबार

गाझियाबाद, दि. 03, सप्टेंबर - उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील खोडा भागात आज भरदिवसा अज्ञातांनी भारतीय जनता पक्षाच्या दोन नेत्यांवर गोळीबार  केला. गजेंद्र भाटी आणि भाजपचे मंडळ अध्यक्ष बलवारी चौहान यांच्यावर गोळीबार केला. भाटी आणि चौहान यांना येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.  मात्र या दोघांची प्रकृती अधिक खालावल्यामुळे त्यांना नोएडाच्या मेट्रो रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुचाकीस्वार हल्लेखोरांनी आज दुपारी 1 च्या सुमारास  गोळीबार केला. या घटनेतंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढाला.