Breaking News

ब्रिक्स परिषदेत फलदायी चर्चेची अपेक्षा - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली, दि. 03, सप्टेंबर - चीन मध्ये होणार्‍या ब्रिक्स परिषदेत फलदायी चर्चा होईल अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. . फेसबुक ,  ट्विटर वर पंतप्रधानांनी उद्यापासून सुरु होणार्‍या ब्रिक्स परिषदेबाबत मतप्रदर्शन केले आहे . त्यात त्यांनी म्हटले आहे की , भारताला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या  परिषदेचे आयोजन करण्याची संधी मिळाली होती . त्या परिषेदेत झालेल्या चर्चेतून अनेक चांगल्या गोष्टी निष्पन्न झाल्या. चीनमध्ये होणार्‍या परिषदेतही फलदायी  चर्चेची अपेक्षा आहे . ब्रिक्स राष्ट्रांची भागीदारी आणखी मजबूत होईल अशी मला आशा आहे . दरम्यान ,उद्यापासून सुरु होणारी ब्रिक्स परिषद 5 सप्टेंबरपर्यंत  चालणार आहे .