Breaking News

पुणे-बंगळुरू महामार्गावर टेंपो चालकाचा महिलेवर बलात्कार

सातारा, दि. 03, सप्टेंबर - मैत्रिणीला भेटून सातारा येथे परत निघालेल्या महिलेला लिफ्ट देऊन तिच्यावर टेंपो चालकाने बलात्कार केल्याची घटना गुरुवारी रात्री  घडली. पुणे-बंगळुरू महामार्गावर भरतगाव (ता.सातारा) गावाच्या हद्दीत सेवा रस्त्यानजीक ही घटना घडली. पीडित महिला ही मूळची नागठाणे (ता. सातारा) येथील  असल्याने यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही मुळची नागठाणे गावची रहिवासी आहे. मात्र दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून ती आई  व दोन लहान मुलींसमवेत सम्राटनगर, कोडोली (सातारा) येथे राहावयास आहे. एका हॉटेलमध्ये काम करून सदर महिला आपली उपजीविका करत. काही दोन  दिवसांपूर्वी अतीत, (ता. सातारा) येथील मैत्रिणीने भेटण्यास बोलावल्याने सदर महिला तिला भेटण्यासाठी गुरुवारी मैत्रीण काम करत असलेल्या काशीळ येथील  हॉटेलवर गेली. तेथून ती सायंकाळी मैत्रिणीच्या अतीत येथील घरी सोबतच आली.
यावेळी सायंकाळी 6.30 वाजता मैत्रिणीने तिच्या एक मित्राला बोलावून घेऊन या महिलेस अतीत बस स्टॉप वरून साताराकडे जाणा-या वाहनात बसविण्यास  सांगितले. सदर मित्राने या महिलेला महामार्गावरून सातारा बाजूकडे जाणा-या एक टेंपोमध्ये बसवून दिले. या घटनेनंतर पीडित महिलेस टेंपो चालकाने शिवीगाळ व  जीवे मारण्याची धमकी देऊन तिला तेथेच अंधारात सोडून टेंपोसह तेथून पलायन केले. पीडित महिला कशी-बशी साता-यात पोहचल्यावर तिने एमआयडीसी पोलीस  चौकीत जाऊन माहिती दिली. त्यांनी तिला बोरगाव पोलीस ठाण्यात पाठविले. रात्री उशिरा या घटनेची तक्रार पीडित महिलेने बोरगाव पोलिसात दाखल केली. या  घटनेचा पुढील तपास सपोनि संतोष चौधरी करत आहेत.