Breaking News

कास पुष्प पठार फुलांच्या हंगामाला सुरुवात

सातारा, दि. 03, सप्टेंबर - जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेल्या कास पुष्प पठारावरील फुलांच्या या वर्षीच्या हंगामाला सुरवात झाली आहे. सातारा  जावळीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी शुल्क संग्रह केंद्राचे फित कापून उद्घाटन केले.
कास पुष्प पठार हे जगाच्या कानकोपर्यात जाऊन पोहचले आहे. साता-याचे नाव अबाधित ठेवायचे असेल तर या पठारावरील वेगवेगळ्या प्रजातींच्या वनस्पतींचे  संवर्धन व संगोपन करणे काळाची गरज आहे. पुष्प पठार पाहण्यासाठी देश विदेशातुन येणा-या पर्यटकांना कास कार्यकारी समितिने चांगल्या प्रकारे सेवा द्यावी, असे  शिवेंद्रराजे यांनी सांगितले.
यावेळी समितीच्या वतीने शिवेंद्रराजे यांचा रोपटे देवून सत्कार करण्यात आला. शिवेंद्रराजे यांनी तिकिट काढून कास पुष्प पठाराचा फेरफटका मारला आणि संबंधित  अधिका-यांकडून फुलांची माहिती घेतली.