Breaking News

बोरिवलीतील शॉपिंग सेंटरला आग; जीवितहानी नाही

मुंबई, दि. 23, सप्टेंबर - बोरिवलीतील गोकुळ शॉपिंग सेंटरच्या पहिल्या मजल्यावर आज सकाळी अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा  प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या आगीत कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नाही, मात्र उद्वाहकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  बोरिवली पश्‍चिम येथे हे पाच मजली शॉपिंग सेंटर आहे. आग लागली त्या वेळी पहिल्या मजल्यावर ‘फॅशन आणि इंटेरियअर डिझाइनिंग’चे खाजगी वर्ग सुरु होते.  आगह लागल्याचे समजताच सर्व मुलांना लगेचच सुखरूप बाहेर काढण्यात आले.