Breaking News

वाघोदा येथील नुतन गणेश मंडळाकडून विविध स्पर्धांचे आयोजन

जळगाव, दि. 02, सप्टेंबर - रावेर तालुक्यातील मोठे वाघोदे येथील शिवाजी चौकातील श्री नूतन गणेश मंडळ व श्रीकृष्ण सांस्कृतिक गोफ मंडळा तर्फे या वर्षी  विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सर्व प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या .संगीत खुर्ची,निंबु चमचा,तीन पाय शर्यत,वक्तृत्व स्पर्धा. रांगोळी स्पर्धा,व  रात्रीच्या वेळेला कब्बडी स्पर्धा अशा स्पर्धा घेण्यात आल्या दरवर्षी नुतन मंडळातर्फे विेविध उपक्रम राबवले जातात. काल या स्पर्धेचा शेवटचा दिवस होता ही स्पर्धा  मोठ्या उत्साहात संपन्न झाली यात शालेय विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवला याठिकाणी प्रकाश विद्यालय,धनाजी नाना महाविद्यालय,म्युनिसिपल हायस्कुल चे  विद्यार्थी सहभाग नोंदवला होता. त्यांनी या खेळातून आपल्या विविध कौशल्याचे दर्शन घडवले मागच्या वर्षी या मंडळाने लोकमान्य टिळक शताब्दीवर्षा निमीत्त बेटी  बचाओ बेटी पढाओ हा सजीव देखावा सादर केला होता. या मंडळाने यात तालुक्यात प्रथम क्रमांक ही पटकावला आहे. आता पर्यंत मंडळाने सर्व उपक्रम जनजागृती  करण्याच्या उद्देशाने केले आहे. वरील झालेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण हे दिनांक-04/09/2017 रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे व याच दिवशी  मंडळा तर्फे महाप्रसादाचे दुपारी 4 वाजेपासून आयोजन केले असून उपस्थितीचे आयोजकांतर्फे आव्हान करण्यात आले आहे.