चिनावलकरांनी घातले गणपत्ती बाप्पाला पावसासाठी साकडे
जळगाव, दि. 02, सप्टेंबर - रावेर तालुक्यातील चिनावल येथे गणेश उस्ताहाचे विसर्जन मोठ्या उत्साहाने करण्यात आले. गावातुन मुख्य मार्गावरुन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत आनंदाने पार पडली. या वेळी चिनावलकरांनी ’गणपत्ती बाप्पा पाऊस पडु दे!’ अशी हाक दिली व साकडे घातले. सावद्याचे स. पो. निरीक्षक राहुल वाघ, गणेश आखाडे यांसह पोलीस कर्मचा-यांनी बंदोबस्त ठेवला.