Breaking News

पीयूष गोयल ,धर्मेंद्र प्रधान , सीतारामन , नक्वी यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती ; 9 राज्यमंत्र्यांचा शपथविधी

नवी दिल्ली, दि. 03, सप्टेंबर - पीयूष गोयल , निर्मला सीतारामन , धर्मेंद्र प्रधान , मुख्तार अब्बास नक्वी यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्यात आली आहे . या  चौघांबरोबर 9 राज्यमंत्र्यांचा शपथविधी राष्ट्रपती भवनात पार पडला . नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही .  शिवप्रताप शुक्ला , डॉ . वीरेंद्र कुमार , अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग , अश्‍वीनीकुमार चौबे , माजी आयएएस अधिकारी आर . के . सिंग , हरदीप सिंग पुरी ,  के . अल्फान्सो , गजेंद्र सिंग शेखावत या 9 जणांचा केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथविधी झाला . राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या सर्वांना शपथ दिली.
राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी , उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू , लोकसभा सभापती सुमित्रा महाजन , केंद्रीय गृह मंत्री राजनाथ  सिंग , भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह विद्यमान मंत्री उपस्थित होते . शिवसेनेचे एकमेव मंत्री अनंत गीते या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.