Breaking News

तूर खरेदी घोटाळा 78 जणांवर गुन्हे दाखल

जालना, दि. 03, सप्टेंबर - तूर खरेदी घोटाळा प्रकरणाचे गांभीर्य वाढत चालले असून जालना येथे या प्रकरणात तब्बल 78 जणांवर गुन्हे दाखल झाल्याचे वृत्त  आहे. तूर खरेदीमध्ये ख-या नोंदणीकृत शेतकर्यांऐवजी इतरांची तूर खरेदी केल्याचा आरोप होता. हिंगोली आणि जालना जिल्ह्यात हे प्रकार मोठ्या प्रमाणावर  घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जालना जिल्ह्यातील गैरप्रकाराच्या प्राथमिक चौकशीआधारे 78 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात व्यापारी व  शेतकरी यांचा समावेश असल्याचे समजते.