Breaking News

चीनमध्ये आजपासून तीन दिवसीय ब्रिक्स परिषद

नवी दिल्ली, दि. 03, सप्टेंबर - चीनच्या जियोमेन येथे आजपासून तीन दिवसीय ब्रिक्स परिषदेची सुरुवात होणार आहे. या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी  चीनचे राष्ट्राध्यक्ष शी चिंगफिंग यांची भेट घेणार आहेत. पाच सदस्यीय देशांचा वार्षिक बैठकीत आर्थिक, सुरक्षा आणि अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार  आहे.पंतप्रधान मोदी आणि चिंगफिंग या भेटी दरम्यान डोकलाम मुद्द्यावर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रिक्स परिषदेमधील पाच देशांच्या समुहामध्ये  ब्राझील,रशिया,भार, चीन आणि द.आफ्रिका या देशांचा समावेश आहे. या परिषदेची स्थापना 2006 मध्ये करण्यात आली होती.