जेटलींच्या मानहानीप्रकरणी केजरीवालांना 5 हजार रुपयांचा दंड
नवी दिल्ली, दि. 04, सप्टेंबर - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची मानहानी केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री केजरीवाल यांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला. उत्तर देण्यास विलंब लावल्यामुळे त्यांना दंड ठोठावल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी प्रसारमाध्यमांना खोटी माहिती दिल्याचा आरोप जेटली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात यापूर्वी केला होता.
अरुण जेटली दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे 1999 पासून 2013 पर्यंत अध्यक्ष होते. या दरम्यान जेटली यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केजरीवाल आणि आप च्या काही नेत्यांनी केला होता. यावर जेटली यांनी केजरीवाल यांच्याविरोधात 10 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता.