Breaking News

शेअर बाजाराच्या निर्देशांकात 190 अंकांची घसरण

मुंबई, दि. 04, सप्टेंबर - मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आठवड्याच्या पहिल्या दिवशी 189.89 अंकांनी घसरून 31,702 अंकांवर बंद झाला. सकाळच्या सत्रात  निर्देशांक 40 अंकांच्या वाढीसह 31,932.20वर खुला झाला होता. त्यानंतर दिवसभरात निर्देशांकाने 31,932चा उच्चांकी आणि 31,560चा नीचांकी स्तर गाठला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 61.55 अंकांच्या घसरणीसह 9,912.85 अंकांवर बंद झाला. सकाळी निर्देशांक 10 अंकांच्या वाढीसह 9,984वर उघडला.  दिवसभरात निर्देशांकाने 9,988ची उच्चांकी तर 9861ची नीचांकी पातळी गाठली. बॉश, पॉवर ग्रीड, विप्रो, वेदांता मर्या., ल्यूपीन, मारूती सुझूकी आदी कंपन्यांच्या  समभागात वाढ दिसून आली. बजाज ऑटो, एचडीएफसी, झी एन्टरटेनमेंट, आयसीआयसीआय बँक. भारती इन्फ्राटेल आदी कंपन्यांच्या समभागात घट दिसून  आली.