गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे मिशन 125 प्लस
अहमदाबाद, दि. 04, सप्टेंबर - आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 125 पेक्षा अधिक जागा मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्य साध्य करून दाखवू असा असा निर्धार काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज येथे व्यक्त केला. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने राहुल गांधी कार्यकर्त्यांसह मतदारांशी संवाद साधत आहेत.
125 हून अधिक जागा मिळवण्यासाठी आवश्यक तयारीला काँग्रेसने सुरुवात केली आहे. राज्यसभेतील एका जागेवर मिळालेल्या यशामुळे राज्यातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे, असेही गांधी यांनी सांगितले. नोटा रद्दच्या निर्णयामुळे गरिबांचे नुकसान झाले असून विकासाची गती कमी झाली आहे. वस्तू व सेवा कर प्रणालीचा गुजरातमधील व्यापा-यांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. देशात बेरोजगारीचा मुद्दा सर्वांत मोठा आहे, अशी टीकाही गांधी यांनी केली. प्रचारानिमित्ताने गांधी आठ वेळा राज्याचा दौरा करणार आहेत. 22 सप्टेंबर रोजी द्वारका येथून दौ-याची सुरुवात होईल. या कालावधीत गांधी पक्षाच्या विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पाटीदार, इतर मागासवर्गीय, दलित समाजाला काँग्रेसकडे आणण्याच्या दृष्टीनेही रणनीती आखली जात आहे.