चेन्नई एक्सप्रेसमधून आणलेली 36 किलो स्फोटके नागपूर रेल्वे स्थानकावर जप्त
नागपूर, दि. 21, सप्टेंबर - चेन्नई एक्सप्रेसने नेण्यात येणारी 36 किलो स्फोटके नागपूर रेल्वे स्थानकावर 19 सप्टेंबर रोजी जप्त करण्यात आली. आरपीएफचे विकास शर्मा यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी उत्तरप्रदेशातील रहिवासी असलेल्या अनिल माणिकचंद निगम याला अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार आरोपी अनिल निगम गेल्या अनेक वर्षांपासून दुकानदारांना स्फोटके पुरविण्याचे काम करतो. दसरा, दिवाळीनिमित्ताने कोल्हापुरात प्रदर्शन आहे. तेथील दुकानदारांना ही स्फोटके देण्यासाठी जात असल्याचे त्याने आरपीएफला सांगितले. ही स्फोटके अतिशय संवेदनशील असून थोडा दाब पडल्यास त्याचा स्फोट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धावत्या रेल्वेत या बारुदीचा स्फोट झाला असता तर मोठ्या दुर्घटनेची भीती होती. यासंदर्भात आज, बुधवारी 20 सप्टेंबर रोजी आयबी आणि स्पेशल टाक्स फोर्सने आरपीएफकडून याबाबत सविस्तर माहिती घेतली.
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार कानपूर येथे स्फोटके तयार करण्याचे कारखाने आहेत. तेथूनच त्याने 17 हजार 600 रुपये किंमतीची स्फोटके खरेदी केली. प्लास्टिकच्या पांढर्या रंगाच्या पोत्यात ही स्फोटके भरून कानपूर रेल्वे स्थानकावर आला. तेथून चेन्नई एक्स्प्रेसच्या जनरल बोगीने कोल्हापूरकडे निघाला. दरम्यान 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास चेन्नई एक्स्प्रेस नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वर थांबली. दरम्यान, आरपीएफ जवान विकास शर्मा हे नेहमी प्रमाणे दारू तस्करांचा शोध घेत होते. त्याचवेळी निगम हा जनरल बोगीत संशयास्पद आढळला. शर्माने त्याची विचारपूस केली. मात्र, त्याने सीट कव्हर असल्याचे सांगितले. मात्र, आरपीएफ पथकाचा त्यावर विश्वास बसला नाही. पोते उघडले असता त्यात सीट कव्हर खाली 36 किलो स्फोटके आढळली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्याला ताब्यात घेऊन वरिष्ठ अधिकार्यांना याबाबत माहिती देण्यात आली. संपूर्ण कारवाई नंतर त्याला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मध्य रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतिजा यांच्या मार्गदर्शनात व निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक कृष्णानंद राय, विकास शर्मा, बी. एस. यादव यांनी कारवाई केली.