Breaking News

विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील 11 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद

पुणे, दि. 02, सप्टेंबर - गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील प्रमुख 11 रस्ते वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहर वाहतूक शाखेने  कळविले आहे. पाच सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरवात होणार आहे. 
वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते- शिवाजी रस्ता - काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक (सकाळी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत) , लक्ष्मी रस्ता- संत कबीर  चौक ते अलका थिएटर चौक(सकाळी सात ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत),3) बगाडे रस्ता- सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक (सकाळी नऊ ते विसर्जन  मिरवणूक संपेपर्यंत), बाजीराव रस्ता- बजाज पुतळा चौक ते फुटका बुरुज चौक ( सकाळी बारा ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत), कुमठेकर रस्ता - टिळक चौक ते  चितळे कॉर्नर ( दुपारी बारा ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत), गणेश रस्ता - दारुवाला पूल ते जिजामाता चौक ( सकाळी दहा ते मिरवणूक संपेपर्यंत), केळकर रस्ता  - बुधवार चौक ते अलका थिएटर चौक ( सकाळी दहा ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत), गुरुनानक रस्ता- देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई  चौक ( सकाळी दहा ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत), टिळक रस्ता - जेधे चौक ते टिळक रोड (सकाळी नऊ ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत), शास्त्री रस्ता -  सेनादत्त चौकी ते अलका थिएटर चौक ( दुपारी बारा ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत), जंगली महाराज रस्ता- झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक( दुपारी चार  ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत), कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.