Breaking News

बार्टीने केले मेहकर तालुक्यातील विधवा व परितक्ता महिलांचे सर्वेक्षण

बुलडाणा, दि. 21, सप्टेंबर - महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत वय 18 ते  58 वर्षांपर्यंतच्या अनु.जातीतील विधवा व परितक्ता महिलांचे सर्वेक्षण मेहकर तालुक्यात दि.4 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरपर्यंत बार्टीचे समतादूत मोहसिन खान यांनी  केले. सदरील सर्वेक्षणाच्या आधारावर भविष्यात विधवा व परितक्ता महिलांसाठी आधारगृह स्थापन करण्यात येणार आहे. तसेच त्यांना स्वत:च्या पायावर उभे  राहण्यासाठी योग्य ती संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यामध्ये मेहकर तालुक्यातील डोणगाव, जानेफळ, अंजनी बु., कळमेश्‍वर, वि.नगर, खंडाळा देवी,  सोनाटी, उकळी, सुकळी, नायगाव दत्तापूर, सावत्रा, शिवाजी नगर, सुळा, उसरण, नागझरी बु. नागझरी खु. इत्यादी गावातील विधवा व परितक्ता महिलांचा  समावेश आहे.