Breaking News

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाची 17 सप्टेंबरला वार्षिक सभा

ठाणे, दि. 03, सप्टेंबर - सुधागड तालुकावासियांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाची 39वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी  17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता श्रीराम मंदिर सभागृह, ठाणे(प.) येथे होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात  येणार आहे. या सभेस संस्थेच्या सर्व सभासदांसह ठाणे, मुंबई, सुधागडातील सर्व रहिवाशांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने सरचिटणीस राजू पातेरे  यांनी केले आहे.
या सभेत संस्थेचा वार्षिक अहवाल सादर करणे, नवीन सभासदांचा सत्कारगेया वर्षी झालेल्या सभेचे वाचनयंदाच्या वर्षाचा आर्थिक अहवाल सादर करून त्यास मंजुरी  देणे आदी बाबी चर्चिल्या जाणार असल्याची माहिती सरचिटणीस राजू पातेरे यांनी दिली आहे.