Breaking News

लालबाग आणि दगडूशेठच्या दर्शनासाठी गर्दी

मुंबई, दि. 03, सप्टेंबर - बकरी ईद आणि रविवार अशा दोन सुट्ट्या सलग लागून आल्यामुळं मुंबईतील लालबागचा राजा आणि पुण्यातील दगडूशेट हलवाई या  दोन्ही गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांनी चांगलीच गर्दी केली आहे.
लालबागच्या राजाला केलेला नवस फेडण्यासाठी राज्यबाहेरूनही भाविक इथं हजेरी लावत आहेत. तर दगडूशेट मंदिरातही मोठ्या प्रमाणात भाविकांच्या गर्दी आहे.  त्यासाठी सुरक्षेसाठी विशेष काळजीही घेण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबईत लालबागच्या राजासोबतच गणेश गल्लीच्या गणपती दर्शनासाठी देखील भक्तांची चांगलीच  झुंबड उडाली आहे.