Breaking News

मुख्यमंत्री आदित्यनाथांनी केले ‘कैलास मानसरोवर भवना’चे भूमीपूजन

गाझियाबाद, दि. 01, सप्टेंबर - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आज येथील कैलास मानसरोवर भवनाचे भूमीपूजन करण्यात आले . यावेळी योगी  आदित्यनाथ यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थांना मान्यता पत्रेही दिली. कैलाश मानसरोवर भवनाची उभारणी केल्यामुळे उत्तर प्रदेशात येणा-या पर्यटकांच्या  संख्येत वाढ होईल. या भवनाच्या उभारणी करतांना अनेक अडचणी आल्या. हे काम थांबावे यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. ज्या जागेवर भवनाची उभारणी  करण्यात येणार होती. ती जागा वादग्रस्त असल्याचे दाखविण्यात आले, असे आदित्यनाथ म्हणाले. कैलाश मानसरोवर यात्रेकरु आणि कावडिया यात्रेकरुंना सुविधा  मिळाव्यात यासाठी या भवनाची उभारणी करण्यात आली आहे.