Breaking News

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात ’जद(यू)’ला स्थान नाही?

नवी दिल्ली, दि. 03, सप्टेंबर - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी सकाळी होणार असला तरीही कॅबिनेटमध्ये जद(यू)च्या नेत्यांना स्थान मिळण्याबाबतचा  प्रस्ताव अद्याप भाजपकडून आम्हाला आलेला नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते. बिहारमध्ये भाजपच्या  पाठिंब्याने जद(यू)ने सत्ता स्थापन केल्यानंतर आणि जद(यू)ने राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश केल्यामुळे बहुप्रतिक्षित केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात जद(यू)च्या  नेत्यांना कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता दाट आहे. मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत भाजपशी आमची चर्चा झाली नसल्याचे नितीश  कुमार म्हणाले.
आमचे खासदार दिल्लीत आहेत. केंद्र सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत आमच्या पक्षात मतभेद कधीही नव्हते. पण मंत्रिमंडळ विस्तार उद्यावर आला असताना  अद्यापही याबाबतचा प्रस्ताव आम्हाला मिळालेला नाही, असे जद(यू)च्या एका नेत्याने सांगितले.