Breaking News

गौरी लंकेश हत्याप्रकरण : मारेक-यांविषयी माहिती देणा-या व्यक्तीला 10 लाख रूपयांचे बक्षीस

बंगळुरू, दि. 09, सप्टेंबर - कर्नाटक सरकारने ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेक-यांविषयी माहिती देणा-या व्यक्तीला 10 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले. राज्याचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी आज याबाबत घोषणा केली आहे. लवकरात लवकर लंकेश यांचे मारेकरी पकडले जावे यासाठी बंगळुरू पोलिसांनी नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच पोलिसांनी यासाठी एक विशेष दूरध्वनी क्रमांक व संकेतस्थळावर संपर्क करण्यास सांगितले आहे.
या प्रकरणी तपास करून लवकरात लवकर लंकेश यांच्या मारेकर-यांना पकडण्याचे आदेश मुख्यमंत्री रिद्धारमैया यांनी दिले आहेत. यासाठी विशेष तपास पथकही स्थापन करण्यात आले आहे. विशेष तपास पथकाच्या मागणीनुसार आणखी अधिका-यांचा यात समावेश केला जाईल, अशी माहिती रेड्डी यांनी दिली.