Breaking News

इंग्लंडचा कर्णधार वॅन रूनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त

लंडन, दि. 24, ऑगस्ट - इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा कर्णधार वॅन रूनी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारली आहे. रूनीने 2003 ते 2017 या 14  वर्षांच्या कालावधीत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. या दरम्यान 119 सामन्यांमध्ये 53 गोल करत रूनी इंग्लंडतर्फे आजपर्यंत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे.  31 वर्षीय रूनीला 2008, 2009, 2014 आणि 2015 असे चार वेळा इंग्लंडचा सर्वोकृष्ट क्रिडापटू या पुरस्काराने गौरविण्यात आले.
संघाचे प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांनी मला निवृत्तीच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, अशी  प्रतिक्रिया रूनीने व्यक्त केली.