Breaking News

हॉकी : युरोप दौ-यासाठी राणी रामपालकडे महिला संघाचे नेतृत्व

नवी दिल्ली, दि. 24, ऑगस्ट - युरोप दौ-यासाठी भारतीय महिला हॉकी संघाची आज घोषणा करण्यात आली असून हरयाणाच्या राणी रामपालकडे नेतृत्वाची  जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘हॉकी इंडिया’कडून आज जाहीर करण्यात आलेल्या 18 खेळाडूंच्या संघात सविताला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. हा दौरा  15 दिवसाचा असून 5 सप्टेंबरपासून नेदरलँड्समध्ये हे सामने खेळण्यात येणार आहेत. या दौ-यादरम्यान प्रशिक्षक सजर्ड मारिज्न हे काही नव्या खेळाडूंना अंतिम  संघात संधी देण्याची शक्यता आहे. जपानमध्ये 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान होणा-या आशियाई महिला हॉकी चषक स्पर्धेच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा  मानला जात आहे.
वर्षाची सुरूवात आम्ही विजयाने केली होती. त्यानंतर काही सामन्यांमध्ये आमची कामगिरी खराब झाली. पण आमच्या ज्या-ज्या चुका झाल्या, त्यातून आम्ही  शिकलो आहोत आणि सुधारणा करत आहोत, असे कर्णधार राणीने सांगितले.