Breaking News

श्रीकांतचा सहज विजय; उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक

ग्लासगो, दि. 24, ऑगस्ट - जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या किदम्बी श्रीकांत याने फ्रान्सच्या लुकास कॉर्वी याचा पराभव करत स्पर्धेच्या  उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने कॉर्वीवर 21-9, 21-17 अशी सहज मात केली. सामन्यातील पहिला गेम श्रीकांत अतिशय सहजपणे जिंकला. दुस-या  गेममध्ये कॉर्वीने काही प्रमाणात झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण श्रीकांतच्या अनुभावापुढे त्याचा निभाव लागला नाही. पुढील फेरीत गुरूवारी त्याची गाठ डेन्मार्कच्या  अँडर्स अँटनसन याच्याशी आहे.