Breaking News

गुरमीत राम रहीम सिंग यांच्याबाबतच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा

नवी दिल्ली, दि, 25, ऑगस्ट - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांच्याविरोधात सूरू असलेल्या खटल्याबाबत उद्या निकाल लागणार असून त्या  पार्श्‍वभूमीवर अमेरिकन उच्चायुक्तांनी भारतातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. उद्याच्या निकालामुळे डेरा समर्थक पंचकूलामध्ये जमायला सुरूवात झाली  आहे. गर्दीचा ओघ पाहता पोलिसांनी सर्व मुख्य रस्ते बंद केले आहेत.
या निकालानंतर हिंसाचार उसळण्याची शक्यता असल्याने हरियाणा कर्मचारी निवड आयोगातर्फे येत्या तीन दिवसातील प्रस्तावित परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.  तर 25 ऑगस्टपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद राहतील अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. उत्तर रेल्वेने गुरूवारी 6 आणि शुक्रवारी पंजाब व  हरियाणाकडे जाणार्‍या 22 रेल्वे रद्द केल्या आहेत. सुमारे 71 तास येथील रेल्वे सेवा बंद राहणार आहे.