Breaking News

कर्नाटक भाजपच्या प्रभारीपदी प्रकाश जावडेकर यांची नियुक्ती

नवी दिल्ली, दि, 25, ऑगस्ट - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गुरूवारी गुजरात, हिमाचल आणि कर्नाटक राज्याच्या निवडणूक प्रभारींची  नेमणूक केली. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे कर्नाटक भाजपचे प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली  यांच्याकडे गुजरातची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गुजरातसाठीकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर, वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री निर्मला  सीतारमण, उत्तर-पूर्व विभाग विकास राज्य मंत्री जितेंद्र सिंग, पी.पी. चौधरी यांची सह-प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
केंद्रीय केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री थावरचंद गहलोत यांच्याकडे हिमाचल प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, या तीन राज्यांमध्ये येत्या  सहा महिन्यांमध्ये निवडणूका होणार आहेत. भारतीय जनता पक्षाकडे केंद्रीतील सत्ता आल्यानंतरची गुजरातमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत.