Breaking News

व्यक्तिगत गोपनीयतेबाबतच्या न्यायालयाच्या निर्णयाचे राहुल गांधींकडून स्वागत

नवी दिल्ली, दि, 25, ऑगस्ट - व्यक्तिगत गोपनीयतेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी स्वागत केले आहे. सर्वोच्च  न्यायालयाच्या निर्णयाने फॅसिस्ट शक्तींना चपराक बसली आहे. हा निर्णय म्हणजे भारतीयांचा विजय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
व्यक्तिगत गोपनीयता नागरिकांच्या स्वातंत्र्याचा महत्त्वाचा भाग आहे. नागरिकांवर पाळत ठेवून दडपशाही करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना हा जोरदार धक्का आहे, अशा  आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. व्यक्तिमत्व वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे जीवनाचा एक  अविभाज्य भाग आहे, असे ते म्हणाले.