Breaking News

सुभाष देसाईंच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई, दि. 08, ऑगस्ट - गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या पाठोपाठ आता राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना विरोधकांनी लक्ष्य केलं. 400 एकर जमीन  भूखंडातून वगळल्याच्या आरोपाखाली, सुभाष देसाईंनी तातडीनं राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी आज विधानसभेत केली. तर सुभाष देसाईंनी हे सर्व आरोप  फेटाळून लावलेत. दरम्यान देसाई आणि मेहतांवरून झालेल्या गोंधळानं विरोधकांनी सभात्याग केला.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी 600 एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र शिवसेनेच्या जवळच्या बिल्डरला फायदा मिळावा  यासाठी यातली 400 एकर जमीन देसाईंनी आरक्षित भूखंडातून वगळल्याचा आरोप विरोधकांनी सुभाष देसाईंवर केला आहे.